बेनझीर पिरजादे – नवाब यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी

सह्याद्री दर्पण
कडेगाव येथील बेनझीर पिरजादे- नवाब यांना रसायनशास्त्र विषयात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची पीएचडी प्राप्त झाली.
पुणे येथील एमआयटी एडीटी युनि्हर्सिटी येथे कार्यरत आहेत. त्यांनी डिग्रेशन ऑफ इफ्ल्यूंट ऑफ इंडस्ट्रीअल डे बाय युसिंग रिकवरेबल मग्नेटिक नॅनो पार्टीकल या विषयावर प्रबंध सादर केला होता. प्रा. डॉ शिवाजी जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. तर प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .वडील जेष्ठ पत्रकार एस एस पिरजादे, पती मुबीन नवाब यांनी त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, एमआयटी आर्ट डिझाईन अँड टे्नॉलॉजी युनि्हर्सिटीचे कुलगुरू डॉ मंगेश कराड यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कडेगांव मुस्लिम समाजात त्या पहिल्या डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या महिला ठर्या आहेत.त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.