डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी

डॉ. पतंगराव कदम यांना लोकतीर्थ स्मारकस्थळी अभिवादन
जयंतीदिनी आठवणींना उजाळा : कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
सह्याद्री दर्पण
काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना परिसरातील लोकतीर्थ स्मारकस्थळी कदम कुटुंबीयांसह राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी,
सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांनी अभिवादन केले.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी समाधीस्थळी विधियुक्त पूजन करून फुले अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी ज्ञानाई भजनी मंडळ शिरंबे ता.कोरेगाव यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार वनश्री मोहनराव कदम ,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, खासदार विशाल पाटील ,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, सौ.स्वप्नाली कदम, सौ.भारती लाड, डॉ.अस्मिता जगताप , अविनाश भोसले, माजी आमदार विक्रम सावंत, रघुनाथराव कदम, डॉ.हणमंतराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, सौ.वैशालिताई कदम, रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, सागर कदम, विजयसिंह कदम, अँड.सुशांत कदम, कदम, डॉ.जितेश कदम, युवा नेते दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, सोनसळचे सरपंच सुरेश कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड ,ऋषिकेश लाड, रोहन लाड, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ.इंद्रजीत मोहिते, के.डी.जाधव, सिकदर जमादार, सतीश पाटील, जे.के.जाधव, इंद्रजित साळुंखे, विनायक पवार, दत्तात्रय यादव,सोनहीराचे संचालक पी. सी.जाधव, बापूसाहेब पाटील, अमोल पाटील, माजी जी प अध्यक्षा मालन मोहिते, सुनील जगदाळे, आनंदराव पाटील , उदगिरी शुगर्सचे संचालक प्रल्हाद पाटील सोनहीराचे कार्यकारी संचालक शरद कदम, सर्व संचालक सभासद व कर्यकर्त्यांनी अभिवादन केले.