आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केलं ७ कोटी ६७ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

नागराळे गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : आ. डॉ. विश्वजीत कदम
मुख्यमंत्री सडक योजनेतून 7 कोटी 67 लक्ष 62 हजारांच्या कामांचे भूमिपूजन
सह्याद्री दर्पण
नागराळे ता. पलूस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम आणि रयत शिक्षण संस्था सातारा उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
डॉ. विश्वजीत कदम आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच नागराळे गावात आल्यामुळे लोकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळत मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, आत्तापर्यंत नागराळे गावांमध्ये अनेक विकासकामे केली गेली आहेत. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी नागराळे गावच्या विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, त्याच पद्धतीने नागराळे गावचा विकास होत राहील. कदम कुटुंबीय व नागराळे गावचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तसेच नागराळे गावाला निधी देताना कुठे कमी पडणार नाही. नागराळे गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
यामध्ये नागराळे – बुर्ली रस्ता काँक्रेटिकरण करणे या कामाचे मुख्यमंत्री सडक योजनेतून 07 कोटी 67 लक्ष 62 हजार रुपये रक्कमेच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते झाले.
नागराळे येथे भैरवनाथ मंदिर ते तानाजी बापू पाटील घरापर्यंत रस्ता काँक्रेटिकरण करणे आमदार फंड रुपये 5 लक्ष या कामाचे लोकार्पण सोहळा गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मा.डॉ. विश्वजीत कदम साहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी जे. के. बापू जाधव, सतीश पाटील, नागराळे व बुर्ली गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ, युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.