ताज्या घडामोडी

राहुल गांधीच्या विरोधात कडेगावात भाजपचा मोर्चा : माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला

सह्याद्री दर्पण

कडेगाव येथे भाजपच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मा.आ.पृथ्वीराज देशमुख (बाबा) यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व ओबीसींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. कडेगाव तहसीलदार यांना सदर बेताल वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे, भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष अशोक साळुंखे, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष भुजंग माळी, उपाध्यक्ष शंकर जाधव, संजय खिलारे, संदीप मोहिते,चंद्रसेन देशमुख, माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, उदय देशमुख, बापूराव पवार, सिकंदर मुलानी, कृष्णा ठोंबरे, अर्जुन सकट, अनिल रेणुशे, अमोल मोहिते, अभिजीत सावंत, प्रदीप यादव, हनमंत थोरात, कैलास शेलार, विकास सूर्यवंशी, आनंदराव मोरे, कृष्णा शिंदे, रवींद्र सूर्यवंशी,सागर सूर्यवंशी, अर्जुन पवार, प्रथमेश भोसले, दत्तात्रय क्षीरसागर, अभिजीत लोखंडे, अरुण शिंदे, सचिन जगताप, दशरथ मोरे, विश्वास मोहिते, विकास भोसले, अभिजीत सावंत, श्रीकांत देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.