कन्हैया कुमार यांची कडेगावात उद्या तोफ धडाडणार : माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचा मेळावा
दत्ता पवार
वाणी आणि बुद्धिचातुर्याने विरोधकांना जेरीस आणणारा ही कन्हैया कुमार यांची ओळख. युवा वर्गाचे खास आकर्षण, काँग्रेस पक्षातील अल्पावधीत लोकप्रिय चेहरा. देशभरात खास करून युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मोठी मागणी कन्हैया कुमारांना असते. आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगावात शनिवारी युवक काँग्रेसचा मेळावा होत आहे. त्यांच्या भाषण शैलीने प्रभावित झालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत.
या मेळाव्याला ना. दिनेश गुंडूराव (मंत्री कर्नाटक), खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी, आ. सतेज पाटील, आ. संजय जगताप, आ. राजू आवळे, आ. अशोक चांदना ( राजस्थान ), आ. भुवन कापरी ( उत्तराखंड ), आ. रविंद्र धंगेकर, आ. डॉ. विक्रांत भुरिया, आ. झीशन सिद्दीकी, अमीर शेख (अध्यक्ष, एन. एस. यु. आय. ), श्रीमती जयश्रीताई पाटील ( उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ) कुणाल राऊत ( अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ) यांची उपस्थिती आहे.